Saturday, April 17, 2021

सकारात्मक विचार

सुप्रभात,
कसे आहात? काळजी घ्या ! असे आपुलकीचे शब्द देखील सध्याच्या काळात बोथट झाल्यासारखे वाटतात. खरं आहे की नाही? रोज एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करणारे आपण सर्व आभासी पद्धतीने, भले ती कृत्रिम का असेना विचारपूस करीत असतो. परंतु परिस्थिती चे गांभीर्य ओळखून, आहे त्यात समाधान मानणे हे आताच्या काळात योग्य आहे ,असे मला वाटते. घराच्या चार भिंतीत आपलं जग सीमित झालं आहे. परंतु लक्षात घ्या सर्व गोष्टींवर काळ हे उत्तम औषध आहे. गोलमाल चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं हे अर्थपूर्ण व सुमधुर गीत आपल्याला बरंच काही सांगून जातं !
   आने वाला पल जाने वाला है
   हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो
   पल जो ये जाने वाला है l
       एक बार यूँ मिली, मासूम सी कली  
       खिलते हुए कहा खुश पाश मैं चली
       देखा तो यहीं हैं ढूँढा तो नहीं हैं
       पल जो ये जाने वाला हैं l
       ओ हो आने वाला पल जाने वाला हैं
       हो सके तो इस में, ज़िंदगी बिता दो
       पल जो ये जाने वाला हैं l
एक लक्षात ठेवा परिस्थिती बदलत असते. मग ती चांगली असो किंवा वाईट. दोन्ही परिस्थितीत स्वतःचे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य टिकवणे आपल्या हातात आहे.
   आताच्या आपत्कालीन परिस्थितीत चिंता करण्यापेक्षा काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. बेफिकिरीने न वागता, उसने अवसान न आणता काळजीपूर्वक पाऊल उचलणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
     आपल्या भावनांना वाट करून द्या. आप्तस्वकीय यांच्याशी फोनवर संभाषण करा. मित्रमैत्रिणींशी गप्पा करा. कधीकाळी आपल्यामुळे दुखावल्या गेलेल्यांची अगत्याने चौकशी करा. त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच, त्यापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो. चला तर मग सकारात्मकतेने आपल्याबरोबर इतरांचे जगणे ही सुकर करू या ! आनंद निर्माण करूया !!
   थांबा, एक गोष्ट सांगतो ....!
           जंगलात जेव्हा वणवा पेटतो. तेव्हा सगळे प्राणी सैरावैरा पळायला लागतात. सगळीकडे नुसती पळापळ चालू असते. त्यामध्ये सगळ्यात चपळ प्राणी वाघ, सिंह , चित्ता, माकड, इ. चपळ प्राणी वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतात. परंतु ,वणवा मात्र कुणालाच सोडत नाही. संपूर्ण जंगल भस्मसात करून सोडतो. सर्व प्राणी जळून खाक होतात. पण तुम्हाला माहीत आहे. त्याच जंगलात असा एक प्राणी आहे ,ज्याला वनव्याचा अजिबात फरक पडत नाही. त्याला जराही ईजा होत नाही. डोकं चक्रावले ना ! तर होय, त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला जंगलातील वनव्याचा काहीही फरक पडत नाही.आणि तो प्राणी म्हणजे उंदीर होय ! कारण जेव्हा वणवा पेटतो तेव्हा तो त्याच्या घरात म्हणजे बिळात असतो. म्हणून त्याला जराही ईजा होत नाही.
   मित्रहो,कोरोनारुपी वणवा सध्या आपल्या मानवी जंगलात पेटला आहे. तर आपल्याला वाघ होऊन काही फायदा नाही. त्यापेक्षा उंदीर व्हा आणि आपल्या(बिळात) घरात रहा. स्वतःला आणि आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवा.
धन्यवाद

आपला
शैलेश पाटोळे
नाशिक.
१८ एप्रिल २०२१
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

10 comments:

दिलीप फडके said...

अतिशय उपयुक्त विचार .. विशेषतः आजच्या संकटाच्या काळात सर्वांनाच अत्यंत उपयुक्त..

Shailesh blog said...

सर ,मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏

Unknown said...

Khup chan

Ravi said...

समर्पक

Unknown said...

अनुकूल प्रतिकूल काळाचा हा खेळ असे चालला या गीतात एक कडवे असे आहे.काळ सुखाचा कधी जीवनी,दुःख कधी उपजे,उजेड पसरे तसाच केव्हा अंधारही माजे,दिनरात्रीचा नित्य असा हा पाठलाग चालला. हे कालचक्र चालूच राहील त्यातून सुखाचा एखादा क्षण शोधू या.आपल्या लेखनीतून तो मिळत असतो.

दिपक पुं कडाळे said...

मित्रा
प्रबोधन छान केलंस
गरज आहे आज .
छान लिहितोस,

Amol said...

या संकट समयी सर्वांसाठी सुंदर व उपयुक्त लेख लिहिला आहे....👌👌👌

Shailesh blog said...

आभारी आहे मित्रांनो, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लेखनासाठी प्रेरणा देतात 🌹🌹🌹

VIRAJ PATOLE said...

In this situation this blog emits positivity which is very useful for the people. This kinds of blogs are necessary to create positivity in negative society !

Poonam Pendse said...

सकारात्मक विचार हा प्रगतीचा पाहिला मार्ग असून आपल्या लेखनातून तो नेहमीच स्पष्ट होतो. पाटोळे सर आपले सुविचार आणि विवेक लेखन नव्या पिढीलाच नव्हे तर सगळ्यांनाच ह्या गंभीर परिस्तिथीत आधार स्तंभ आहेत. एक कुशल लेखक म्हणून आपल्यास खूप लौकिक मिलो हिच सदिच्छा.... आपणांस भरभरून शुभेच्छा....
सौ पूनम पेंडसे 🙏🙏👍👍

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...